वैजापूर-येवला रस्त्यावर भरधाव टँकरने मोटारसायकलला उडवले ; महाविद्यालयीन युवक ठार

वैजापूर ,​१ मार्च​ ​​​​/ प्रतिनिधी :- भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने धडक दिल्याने महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. ही घटना वैजापूर – येवला रस्त्यावर येवला नाक्याजवळ  बुधवारी(ता.01) दुपारी दोनच्या सुमारास घडली. माधव लहानु गायधने (वय 18 वर्ष) रा. ढोकनांदूर असे अपघातातील मयत युवकाचे नाव आहे.

माधव हा विनायकराव पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो त्याच्या मोटारसायकल (एम.एच.20 जी. एफ. 7008) वर महाविद्यालयांकडून वैजापूरकडे येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने  (एम.एच.17 बी.डी. 2425) त्याच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.या अपघातात टँकरखाली सापडल्याने माधव याचा जागेवर मृत्यू झाला.वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.या प्रकरणी लहानू मुरलीधर गायधने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकर चालक नानासाहेब बबन सांळुके रा. चित्तरखेडा याच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.