मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजपासून दोन दिवस औरंगाबाद जिल्हा दौरा

औरंगाबाद,२९ जुलै /प्रतिनिधी :-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि.30 व 31 जुलै, 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि.30 जुलै, 2022 दुपारी 03.00 वा. मालेगाव येथून मोटारीने वैजापूर जि.औरंगाबादकडे प्रयाण. सायंकाळी 06.00 वा. शासकीय विश्रामगृह, वैजापूर येथे आगमन व राखीव. 06.30 वा. शिवसेना पक्षाची जाहीर सभा (स्थळ : महालगाव ता.वैजापूर) रात्री 08.00 वा. वैजापूर येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण. 10.00 वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन, राखीव व मुक्काम.

रविवार, दि.31 जुलै, 2022 रोजी सकाळी 10.00 वा. ते 11.30 वा. पाऊस, अतिवृष्टी, पिक-पाणी व विकास कामे विभागीय आढावा. (स्थळ : विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद). सकाळी  11.30 वा. ते 12.00 वा.  पत्रकार परिषद (स्थळ : औरंगाबाद). दुपारी 12.00 वा. ते 12.30 वा. राखीव. 12.30 वा. औरंगाबाद येथून मोटारीने सिल्लोडकडे प्रयाण. 01.30 वा. ते 02.15 वा. बाळासाहेब ठाकरे उद्यान लोकार्पण सोहळा (स्थळ : सिल्लोड, जि.औरंगाबाद). 02.30 वा. आमदार श्री.अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी राखीव. 02.30 वा. ते 02.45 वा. 1) नगरपालिका इमारतीचे भुमीपूजन 2) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण. 3) प्रवेश द्वाराचे लोकार्पण. 4) नॅशनल सहकारी सुतगिरणी भूमीपूजन. (स्थळ : सिल्लोड, जि.औरंगाबाद). 02.45 वा. ते 04.15 वा. शिवसेना पक्षाची जाहीर सभा. (स्थळ : नगर परिषद मैदान). सायंकाळी 04.15 वा. सिल्लोड येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण. 06.00 वा. ते 06.15 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन. (स्थळ : हर्सूल नाका, औरंगाबाद). 07.00 वा. ते 07.15 वा. 1) छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन, औरंगाबाद. 2) अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन, औरंगाबाद. 07.20 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन. (स्थळ : भडकल गेट, औरंगाबाद) 07.40 वा. ते 08.00 वा. आमदार श्री.प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयात आगमन व राखीव. रात्री 08.00 वा. औरंगाबाद येथून मोटारीने समर्थनगर मार्गे सिल्लेखाना, क्रांतीचौककडे प्रयाण. 08.15 वा. 1) छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन 2) शीख समाजाच्या गुरूद्वारास भेट (स्थळ : क्रांती चौक औरंगाबाद). 08.15वा. ते 09.15वा. आमदार श्री.संजय शिरसाठ यांच्या कार्यालयात आगमन व राखीव. 09.15 वा. गारखेडा स्टेडिअम मार्गे आमदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयाकडे प्रयाण. 09.30 वा. ते 09.45 वा. आमदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात आगमन व राखीव. 09.45 वा. आमदार श्री.अतुल सावे यांच्या कार्यालयाकडे प्रयाण. 10.10 वा. आमदार श्री.अतुल सावे यांच्या कार्यालयात आगमन व राखीव. 10.30 वा. आमदार श्री.अतुल सावे यांच्या कार्यालयातून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण. रात्री 11.00 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.