संजय राऊत यांच्याविरोधात जोडोमार आंदोलन

खासदार संजय राऊतांच्या अडचणी वाढणार; मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावर गुन्हे दाखल

नाशिक (प्रतिनिधी ): ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राउत यांच्या प्रतिमेला शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीने जोडोमार आंदोलन सोमवारी दुपारी करण्यात आले.

नाशिकमध्ये रविवारी मध्यरात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आता नाशिकमध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. शिवसेना युवासेना संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक झाली असून त्यांनी थेट आंदोलन केले आहे. नाशिकच्या द्वारका चौकात संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी देत. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये झालेल्या आंदोलनानंतर राज्यामध्ये इतरही भागात अशी आंदोलन होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासमोर अडचणी यांच्या वाढू लागले आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली. यानंतर आता याचे पडसाद दिसून येत असून त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात ठाणे आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात कलम ५०० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी हा गुन्हा दाखल केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणत बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.

तसेच, ठाण्यामध्येही संजय राऊत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध करत ‘जोडे मारो’ आंदोलन केले होते. त्यानंतर ठाणे नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून अखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी अधिक माहिती घेऊन याबद्दल चौकशी करू, असे आश्वासन दिले आहे. नाशिक पाठोपाठ आता ठाण्यामध्येही त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होताना दिसत आहे.