पर्यटन स्थळी No Vaccine No Entry या सूत्राची अंमलबजावणी होणार

“हर घर दस्तक” व “ माझा वार्ड शतप्रतिशत लसीकरण वार्ड ” अंतर्गत लसीकरणाचा पाठपुरावा

लसीकरण मोहिम प्रभावी पणे राबविण्यासाठी पर्यटन स्थळा बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित

औरंगाबाद ,९ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, अंजिठा लेणी, वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला आणि पितळखोरा लेणी  पर्यटन स्थळाबाबत मार्गदर्शक सूचना व आदेश जारी केले असून त्यांची अंमलबजावणी बाबत संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांनी या आदेशाचे पालन करण्याबाबत खालील मार्गदर्शक सूचना आज दि.09 नोव्हेंबर पासून निर्गमित केल्या आहेत.

            जिल्ह्यातील सर्व पर्यटन संबधी शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये जसे पर्यटन आयोजित करणाऱ्या संस्था (Travel Agency) मध्ये कार्यरत, कर्मचारी यांच्या कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख, आस्थापना प्रमुख यांनी करावी. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात जावे किंवा लसीकरणाचे विषेश सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

             पर्यटन स्थळावर भेटी देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे तिकीट बुकिंग करुन पर्यटन होत अशा बाबत छोटी, मोठी संग्रहालये, ऐतिहासिक वास्तू किंवा तत्सम पर्यटनस्थळे जेथे पर्यटकांची वर्दळ असते अशा सर्व ठिकाणी लसकरणाची किमान एक मात्रा (Dose) पूर्ण केलीली असणे आवश्यक व लसीकरणाची एकही मात्रा झालेली नसल्यास अशा पर्यटकांची नोंदणी (Ticket Booking) मान्य करण्यात येऊ नये, त्यास प्रवेश देऊ नये. तसेच पर्यटकांचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांकावरुन लसीकरण झाल्याची पडताळणी करण्यात यावी.

            ज्या पर्यटन स्थळावर पर्यटकांची संख्या अधिक असते अशा ठिकाणी लसीकरणाची उद्दिष्टपूर्तीच्या द्दष्टिने आपल्या विभागामार्फत जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका यांच्या मदतीने विशेष मोहिम राबवून, अधिकअधिक पर्यटकांचे लसीकरण करावे व लसीकरणाचे 100% उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करुन त्या द्दष्टीने कार्यवाही करावी.

             महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) अंतर्गत पर्यटन स्थळांवरील सर्व प्रकारचे दुकाने, हॉटेल, रिसॉर्ट, निवासव्यवस्था येथील कर्मचारी, कामगार व कार्यरत मनुष्यबळाची लसीकरणाची किमान 01 मात्रा (Dose) पूर्ण झालेल्या असतील अशीच दुकाने, हॉटेल,रिसॉर्ट, निवासव्यवस्था यापुढे खुली करण्यास मुभा राहील.

            जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळी येणाऱ्या सर्व पर्यटकांना व सर्व अभ्यागतांना लसीकरणाची किमान 01 मात्रा झालेली नसल्यास, त्यांना पर्यटन स्थळी प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत “No Vaccine No Entry” हा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला जाईल याची सर्वांनी नोंद घेऊन पूर्तता करावी.

            “No Vaccine No Entry” यानुसार आंतरजिल्हा व आंतरराज्य बसने, खाजगी प्रवासी वाहनाने प्रवास करण्यासाठी देखील लसीरकणाची किमान 01 मात्रा पूर्ण झालेली असणे बंधनकारक राहील.

            वरील सर्व पर्यटनास्थळी ( जसे-बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, पितळखोरा लेणी, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला, वेरुळ लेणी इत्यादी ) Vaccination Booth स्थापन करण्याची कार्यवाही जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. आरोग्य अधिकारी म.ना.पा.यांच्या मार्फत त्या-त्या कार्यक्षेत्रात करण्यात यावी.

            उपरोक्त सर्व बाबीसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे. मास्क वापरणे, गज दुरी (2 फूट अंतर), सॅनीटायझर आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे अनिवार्य.

            लोकजागृतीतून लसीकरण मोहीम राबविण्यातवर भर देण्यात यावा, लसीकरणास पात्र लाभार्थ्यांचे 100% लसीकरणाचा दुसरा डोस Covidhield -84 दिवस व Covaxin-28 दिवसांनी घेणे अनिवार्य आहे. त्यासाठी प्रथम मात्रा विहित कालावधी पूर्ण झालेल्या नागरिककांकडे हर घर दस्तक व माझा वार्ड शतप्रतिशत लसीकरण वार्ड या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या डोस साठी पाठपुरावा करावा.

            Covid Appropriate Behavior (CAB) उल्ल्ंघन करणाऱ्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. निम्न स्वाक्षरीकार प्रस्तुत आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करु शकतील, सदर आदेशाची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत लागू राहील.

            सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1987 अन्वये दंडनीय, कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील.

             सदरीत आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण, यांनी निर्गमित केले आहे.