जिसा शाळेतील विद्यार्थी करणार ‘जिज्ञासा’

चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून माळीवाडा गावातील विद्यार्थ्यांना एक लाखापर्यंतची शैक्षणिक मदत

औरंगाबाद,१६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद शहरामध्ये नावाजलेली शाळा म्हणजे जिसा. सामाजिक कार्याच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम घेऊन मुलांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे जिसा. या शाळेतील वर्ग पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळून 120 कॅनव्हास बनवले आहेत.

G 20 मध्ये औरंगाबाद शहर हे वेगवेगळ्या चित्रांनी वेगवेगळ्या रंगांनी सजवले जात आहे. ही कल्पना डोक्यात घेऊन शाळेच्या विद्यार्थ्यांनी हे चित्र कॅनव्हास वरती उतरवले आहेत. ‘ जिज्ञासा ‘ या शीर्षकाखाली 120 कॅनव्हास पेंटिंग चे चित्र प्रदर्शन एमजीएम कला दीर्घ आर्ट गॅलरी येथे 17, 18,19 फेब्रुवारी 2023 या तीन दिवशी सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत सर्व औरंगाबादकरांसाठी मोफत बघण्यासाठी सुरू राहणार आहे. तरी जास्तीत जास्त औरंगाबादकरांनी या चित्र प्रदर्शनाला भेट द्यावी आणि मुलांना प्रोत्साहित करावे.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून माळीवाडा गावातील विद्यार्थ्यांना एक लाखापर्यंतची शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांच्या हातून करण्यात येणार आहे.
असे आवाहन शाळेचे व्यवस्थापकीय संचालक श्री जितेंद्र छाजेड व श्री अभिजीत छाजेड यांनी केले आहे.