गणेश भक्तांचा दुस-या वर्षीही हिरमोड,फुलंब्री नगरपंचायतीच्या वतीने गणपती संकलन

फुलंब्री, 20 सप्टेंबर / प्रतिनिधी :- को रोनाच्या प्रादुर्भावामुळे  सलग दुसऱ्या ही वर्षी गणपती बाप्पाला शांततेत निरोप दिला गेल्याने गणेश भक्तांचा हिरमोड झाला. नगरपंचायतीच्या वतीने गणेश मुर्तीचे संकलन करुन पोलीस बंदोबस्तात एकत्र शांततेत विसर्जन करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने  ठरवुन दिलेल्या नियम पालन करत येथील संत सावता मंदिर येथे आरती करुन गणपती  विसर्जनासाठी सुरुवात करण्यात आली. गणपती विसर्जनाच्या ठिकाणीही गर्दी होणार यांची काळजी घेत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावुन  गणेश मुर्ती चे संकलन करण्यात आले.


नगरपंचायत प्रशासन स्वतःहून शहरामध्ये फिरून गणपती बाप्पा च्या मुर्त्या संकलन करुन नगरपंचायतीच्या व पोलिस प्रशासनाच्या वतीने  विसर्जन करण्यात आले.याप्रसंगी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, पोलीस निरीक्षक  अशोक मुगदीराज, उपनगराध्यक्ष गजानन नागरे, मुख्याधिकारी नंदा गायकवाड, युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मीक जाधव, बाबासाहेब शिनगारे, गणेश राऊत, अजय शेरकर,पोलिसउपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे , नंदकिशोर दांडगे, जयसिंग नागलोद नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.