‘स्वारातीम’ विद्यापीठाला पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सवात सात पारितोषिके

नांदेड ,१६ फेब्रुवारी  / प्रतिनिधी :-गणपत विद्यापीठ, मेहसाणा गुजरात येथे दि. १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने सात पारितोषिके पटकाविले आहेत. 

या महोत्सवात आदिवासी नृत्य, एकांकिका, विडंबन, लोकसंगीत, समूहगीत भारतीय, सुगम गायन, शास्त्रीय गायन, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय सुरवाद्य, मिमिक्री, स्पॉट फोटोग्राफी, रांगोळी, मृद मूर्तीकला, कलात्मक जुळवणी, पोस्टर मेकिंग, मेहंदी इत्यादी कला प्रकारात सहभाग नोंदवला होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांचे दर्जेदार सादरीकरण करून दोन गोल्ड आणि दोन सिल्वर यासह एकूण सात पारितोषिके आणि फाईन आर्ट मध्ये तृतीय क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद मिळविले आहे. त्यामध्ये सुमित हसाळे (मिमिक्री) प्रथम, संकेत गाडेकर (स्थळ छायाचित्रण ) प्रथम, किशोरी मुरके (सुगम गायन) द्वितीय, शिवराज मुधोळ (मेहंदी ) द्वितीय, शिवराज मुधोळ (रांगोळी) चतुर्थ,  संजय भराडे  (पोस्टर मेकिंग) चतुर्थ, शिवानी ढोरे (मृदमूर्तीकला) यांनी चतुर्थ  पारितोषिक मिळविले असून फाईन आर्ट मध्ये तृतीय क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद मिळवीले आहे.  

प्रशिक्षक म्हणून डॉ. संदीप काळे, प्रा.सिद्धार्थ नागठाणकर, डॉ. शिवराज शिंदे, डॉ. पांडुरंग पांचाळ, संदेश हटकर, दिलीप डोंबे, नवलाजी जाधव, महेश घुंगरे यांनी  विशेष परिश्रम घेतले तर संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. विजय पवार डॉ. रचना हिपळगावकर प्रा.माधुरी पाटील सोबत होते. पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात विद्यापीठाच्या संघाने यश मिळवल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले,  प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, अधिष्ठाता डॉ.अजय टेंगसे, डॉ. एल.एम.वाघमारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, क्रीडा संचालक डॉ.विठ्ठलसिंह परिहार, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाबासकी दिली आणि त्यांचे अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय महोत्सवासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.