नांदेड जिल्ह्यात 1 हजार 73 व्यक्ती कोरोना बाधित ; 16 मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 27 :- नांदेड जिल्ह्यात शनिवार 27 मार्च 2021 रोजी 1 हजार 73 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 4 हजार 257 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 528 तर अँटिजेन तपासणीद्वारे 545 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 73 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 38 हजार 598 एवढी झाली आहे.

गुरुवार 25 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सिडको नांदेड येथील 55 वर्षाच्या एका महिलेचा, लोहा येथील 60 वर्षाच्या पुरुषाचा, तरोडा बु. नांदेड येथील 40 वर्षाच्या पुरुषाचा तर शुक्रवार 26 मार्च रोजी विष्णुपुरी नांदेड येथील 67 वर्षाच्या पुरुषाचा, मुदखेड येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे आनंदनगर नांदेड येथील 42 वर्षाच्या महिलेचा, पिरबुऱ्हानगर नांदेड येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा, गुलजारबाग नांदेड येथील 28 वर्षाच्या पुरुषाचा, वजिराबाद नांदेड येथील 72 वर्षाच्या महिलेचा, आनंदनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या महिलेचा, कंधार तालुक्यातील दाताळा येथील 52 वर्षाच्या पुरुषाचा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे गणेश टॉकीज जवळ नांदेड येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा, हदगाव कोविड रुग्णालय येथे हिमायतनगर तालुक्यातील पारवा येथील 71 वर्षाच्या पुरुषाचा, नांदेड येथील 80 वर्षाच्या महिलेचा, माणिकनगर नांदेड येथील 50 वर्षाच्या पुरुषाचा, शनिवार 27 मार्च रोजी भोकर गांधी चौक येथील 65 वर्षाचा पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 713 एवढी झाली आहे.

आजच्या 4 हजार 257 अहवालापैकी 3 हजार 61 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 38 हजार 598 एवढी झाली असून यातील 28 हजार 518 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 9 हजार 134 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 108 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 15, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 415, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 5, कंधार तालुक्यांतर्गत 6, मुखेड कोविड रुग्णालय 22, देगलूर कोविड रुग्णालय 3, धर्माबाद तालुक्यांतर्गत 44, मुदखेड तालुक्यांतर्गत 12, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 25, हदगाव कोविड रुग्णालय 10, किनवट कोविड रुग्णालय 2, बिलोली तालुक्यांतर्गत 5, उमरी तालुक्यांतर्गत 20, माहूर तालुक्यांतर्गत 11,भोकर तालुक्यांतर्गत 6, खाजगी रुग्णालय 35 असे एकूण 638 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.88 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 97 हजार 480एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 52 हजार 624एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 38 हजार 598एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 28 हजार 518एकुण मृत्यू संख्या-713उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.88 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-100आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-409रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-9 हजार 134आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-108.