नारंगी धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तन सोडले

वैजापूर ,७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर शहरालगत असलेल्या नारंगी मध्यम प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे शेती पिकासाठी रब्बी हंगाम 2022-23 चे आवर्तन मंगळवारी (ता.07) सोडण्यात आले. रब्बी हंगामासाठी नारंगी मध्यम प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. आमदार  रमेश पाटील बोरणारे यांनी या प्रश्नात लक्ष घातले व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नारंगी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यासंदर्भात सांगितले. त्यानुसार आज नारंगी धरणातून डाव्या कालव्याला पाणी आवर्तन सोडण्यात आले.

आ. बोरणारे व माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्याहस्ते विधिवत पूजा करून पाणी सोडण्यात आले.याप्रसंगी नांदूर मधमेश्वर कालवा विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजन खापर्डे, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, शहरप्रमुख पारस घाटे, युवासेना तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, उपतालुकाप्रमुख कल्याण जगताप, पंचायत समिती सदस्य रविंद्र कसबे, उपविभागप्रमुख हरिभाऊ साळुंके, सजनराव गायकवाड, राजू राजपूत, कनिष्ठ अभियंता योगेश सुरासे, सरपंच विकास गायकवाड, अशोक गायकवाड, उपसरपंच प्रविण धने, पोलिस पाटील आप्पासाहेब गायकवाड, दादासाहेब साळुंके, पोपट गवळी, प्रदिप मतसागर, चंद्रकांत साळुंके, उदयभाऊ गायकवाड, रामकृष्ण जोरे, शंकर मुळे, शिवनाथ साळुंके, शांतीलाल गायकवाड, बाबासाहेब  साळुंके, सोन्याबापू साळवे, गोकुळ साळुंके यांच्यासह वैजापूर – घायगाव परिसरातील लाभधारक शेतकरी उपस्थित होते.