वैजापूर लोकअदालतमध्ये पावणे दोन कोटींची ८८० प्रकरणे निकाली

वैजापूर ,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुका विधिसेवा प्राधिकरण व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी वैजापूर न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 880 प्रकरणे निकाली काढण्यात आली.विविध विभागाची एकूण 1 कोटी 86 लाख 87 हजार रुपयांची वसुली तडजोडीद्वारे करण्यात आली.

जिल्हा व सत्र न्यायाधीश मोईयोद्दीन एम.ए. यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने लोकअदालतचे उदघाटन झाले.लोकअदालतीमुळे वेळ व पैशाची मोठी बचत होते तसेच समाजातील शत्रुत्वाची भावनाही कमी होण्यास मदत होते त्यामुळे वकील व पक्षकारांनी लोक अदालतीच्या माध्यमातून आपली प्रकरणे तडजोडीने सोडवावीत.असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश मोईयोद्दीन यांनी यावेळी केले. या  राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 573 व वादपूर्ण 307अशी एकूण 880 प्रकरणे निकाली काढण्यात आली. विविध विभागाची एकूण 1 कोटी 86 लाख 87 हजार रुपयांची वसुली तडजोडीद्वारे करण्यात आली.

या राष्टीय लोकअदालतीत जिल्हा न्यायाधीश डी.एम.आहेर,दिवाणी न्यायाधीश आर.एन. मर्क,सह दिवाणी न्यायाधीश पी.टी. शेजवळ,पी.आर.दांडेकर,प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.आर.शिंदे,एस.एस.निश्चल, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, तहसीलदार राहुल गायकवाड,वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र हरिदास,ऍड सचीव ऍड.सईद अली,ऍड.नानासाहेब जगताप, ऍड.प्रताप निंबाळकर, ऍड.महेश कदम, ऍड.राफेहसंन,ऍड.संजय बत्तीसे, ऍड.प्रवीण साखरे, ऍड.किरण त्रिभुवन, ऍड.दत्तात्रय जाधव,ऍड.सचिन दहिभाते, ऍड.यासर, ऍड.मझहर बेग, ऍड.अनिल रोठे आदी यावेळी उपस्थित होते.कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून वकील व पक्षकारांनी लोक अदालत मध्ये सहभाग घेतला होता