वैजापूर येथील संजीवनी अकॅडमी इंग्रजी शाळेत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला अवतरले छोटे विठ्ठल …

वैजापूर ,८ जुलै  /प्रतिनिधी :- आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला येथील संजीवनी अकॅडमी  या इंग्लिश माध्यमाच्या शाळेत व सेंट मोनिका इंग्लिश शाळेत शुक्रवारी छोट्या बालकांनी विठ्ठल व रुक्मिणीची भूमिका साकारून शालेय विद्यार्थ्यांना पंढरपूरच्या विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घडवून आनंदीत केले. 

शाळेतील सर्व विद्यार्थी या अनोख्या बालकांना विठ्ठल -रुख्मिणीच्या भूमिकेत पाहून सुखावले.

विठ्ठलाच्या भूमिकेत संजीवनी शाळेचा विद्यार्थी रिशान सचिन राजपूत व सेजल पवार या चिमुकलीने सेंट मोनिका शाळेत रुख्मिणीची  भूमिका साकारली. या छोट्या मुलांच्या या आकर्षक भूमिकाची प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी तोंड भरून प्रशांसा केली.