नाटु नाटु! पंतप्रधानांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी केले कौतुक

मुंबई ,११ जानेवारी  / प्रतिनिधी :- जगभर गाजलेला प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाला ग्लोबल सन्मान मिळाला आहे. या चित्रपटाचे गाणे ‘नाटु नाटु’ या गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अशामध्ये देशभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते, अभिनेत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, ” तुम्ही खूप मोठे यश संपादन केले, त्यासाठी ‘आरआरआर’ च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. तुम्ही हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवल्याने साऱ्या भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला.”

बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनीदेखील अभिनंदन करताना म्हटले की, “संपूर्ण टीमचे अभिनंदन. तुम्ही या सन्मानासाठी पात्र आहात, सर्वोत्तम कामगिरी!