महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

May be an image of 1 person, standing and outdoors

औरंगाबाद ,१ मे /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.

May be an image of one or more people, people standing and outdoors

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाचे या संदर्भातील नियम पाळुन अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम घेण्यात आला.