सोनू सूदने टाकले अक्षयला मागे

सध्या सोशल मीडियावर केवळ आणि केवळ एका अभिनेत्याची चर्चा आहे तो म्हणजे सोनू सूद. करोना विरोधातील या युद्धात तो एका योद्ध्याप्रमाणं उतरला आहे. इतर राज्यात अडकून पडलेल्या श्रमिकांना त्यांच्या त्यांच्या गावी  परातीत पाठविण्यासाठी अभिनेता सोनू सूदने जे काम केले  त्यासाठी त्याचे  सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. त्याने या श्रमिकांसाठी भरपूर बसेसची व्यवस्था केली. गोरगरीबांसाठी हिरो ठरलेल्या सोनूचे नाव गेल्या काही दिवसांत गुगलवर सर्वाधिक सर्व करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यानं गुगल ट्रेडिंगच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. देशातील कानाकोपऱ्यातून त्याच्याविषयी सर्च करण्यात आले आहे. ट्रेडिंगच्या यादीत त्याने  खिलाडीकुमारलाही मागे टाकले आहे.

sonu s_1  H x W
दरम्यान,गेले काही दिवस रोज सुमारे अठरा तासांहून अधिक काळ सोनू फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदत करण्यात व्यग्र असतो. परंतु, अशा परिस्थितीतही परवानगी मिळण्यात काही प्रमाणात अडचणी येत असल्याचे  तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो. बसमधून श्रमिकांना पाठवताना सुरक्षित वावराचे नियम तो पाळतो. आसनक्षमता ६० असलेल्या बसमधून तो ३५ प्रवाशांना पाठवतो. या प्रवाशांच्या जेवण-खाण्याची व्यवस्थाही तो करतो. सोनूची मैत्रीण निती गोयलच्या बरोबरीने ‘मित्र पाठवा’ या उपक्रमाला सुरुवात झाली आणि त्यामुळे तो सर्वांसाठी त्यांचा लाडका सुपरहिरो बनला. सोनूच्या ट्विटर अकाऊंटवर त्याला टॅग करून आलेल्या पोस्टला उत्तर देताना, ‘काळजी करू नका. मला तुमची माहिती पाठवा, लवकरच तुम्ही घरी जाल’ असे सांगणारी पोस्ट तो करतो. ट्विटरवर तो ज्या प्रकारे चटकन लोकांना प्रतिसाद देतोय, ते पाहून सोनूचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *