स्व.विनायकराव पाटील यांचा स्मृतिदिवस विनायकराव पाटील महाविद्यालयात विविध उपक्रमांनी साजरा

वैजापूर,२८ डिसेंबर / प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा  वैजापूर तालुक्यात विकासाची गंगा आणणारे  भाग्यविधाते स्वर्गीय विनायकराव पाटील (अण्णा) यांचा 54 वा स्मृतीदिवस वैजापूर शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालयात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या परिसरातील स्वर्गीय विनायकराव पाटील (अण्णा) यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.त्यानंतर महाविद्यालयाच्या ग्रंथालय आयोजित विविध अभ्यासपूर्ण  ग्रंथोत्सवाचे उदघाटन करण्यात आले व तदनंतर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आमराई परिसरात केशर आंब्यांच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येऊन क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित विविध मैदानी स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा विनायकराव पाटील महाविद्यालय विकास समिती प्रमुख कृषीभूषण अप्पासाहेब पाटील, उल्हास ठोंबरे, ॲड. देवदत्त पवार, रावसाहेब जगताप, मजिद कुरेशी, आनंदीबाई अन्नदाते, व्हि.जी.ठोंबरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंके, उपप्राचार्य डॉ. संदीप परदेशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस.पी.चव्हाण, पर्यवेक्षक प्रा.जे.एस.पाटील, पर्यवेक्षक प्रा.बी.जे. गायके, रजिस्ट्रार विजय आहेर  यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकत्तेर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.