वैजापूर तालुका भाजपची सोमवारी महत्वाची बैठक

वैजापूर,३१ जुलै /प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी वैजापूर तालुका कार्यकारणीची महत्त्वाची बैठक सोमवारी येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत यांनी दिली.शहरातील लाडगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे.
1. तालुक्यातील बुथ रचनेचा आढावा घेणे.
2. बूथ सशक्तिकरण मोहिमेच्या प्रवासाबाबत नियोजन करणे.3. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या बाबत इच्छुकाची नोंद घेणे व निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करणे4. विकास कामाबाबत चर्चा करणे. आदी महत्वाच्या विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्याया बैठकीस भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी, अभय पाटील चिकटगावकर, जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पैठणपगारे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जगताप, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष कैलास पवार, नगरपालिका गटनेते दशरथ बनकर, जिल्हा चिटणीस मोहनराव आहेर, नारायण तुपे, डॉ. राजीव डोंगरे, नबी पटेल उपस्थित राहणार आहेत.  तालुक्यातील पक्षाचे सर्व पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,  सर्कल मधील सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बुथ अध्यक्ष, कार्यकर्ते , इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपले विचार मांडावे.असे आवाहन पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे व शहराध्यक्ष दिनेश राजपूत यांनी केले आहे.