जरुळ येथे 28 लक्ष रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे भूमीपूजन

वैजापूर,२४ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील जरुळ गावासाठी राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी 28 लक्ष 56 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमीपूजन आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते शनिवारी (ता.24) करण्यात आले.

या प्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रामहरी बापू जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंग राजपूत, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, भाजप तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, शहरप्रमुख पारस घाटे, उपतालुकाप्रमुख प्रकाश पाटील मतसागर, पंचायत समिती सदस्य सुरेश पाटील राऊत, सरपंच  शितलताई मतसागर, उपसरपंच मीराबाई मतसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. रमेश बोरणारे, डॉ.दिनेश परदेशी यांची यावेळी  भाषणे झाली.  साहेबराव मतसागर, दिगंबर पाटील मतसागर, साईनाथ मतसागर, चेअरमन रुस्तुम पाटील मतसागर, एकनाथ मतसागर, दत्तू कुहीले, रामदास  मतसागर, नवनाथ मतसागर, नाना मतसागर, अण्णा  मतसागर, दिनकर कुहिले, देविदास मतसागर, माजी सरपंच साहेबराव फुलारे, विनायक मतसागर, भास्कर  मतसागर, वाल्मीक बावचे, नारायण बावचे, संतोष  बगांळ, मंगेश निपटे, रामदास पवार, संजय फरताळे, विशाल मतसागर, विजय फुलारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.