वृदिका राजपूत हिची राष्ट्रीय स्तरावरील टेनिस स्पर्धेसाठी निवड

वैजापूर,२४ डिसेंबर / प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्हयातील वृदिका राजपूत या टेनिस खेळाडूची बारा वर्षाखालील मास्टर्स स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचणीत राष्ट्रीय मानांकन प्राप्त करणा-या दहा खेळाडूत महाराष्ट्रातून प्रतिनिधीत्व करणारी ती एकमेव टेनिसपटू आहे. 

राजपूत ही जयशवंत टेनिस अकॅडमीतून प्रशिक्षक रुपेश राॅय यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस खेळाचे कौशल्य आत्मसात करुन नियमितपणे सराव करते. वडील भागवत बिघोत यांच्या प्रोत्साहनामुळे वृदिका हिने शैक्षणिक गुणवत्ते सोबतच क्रिडा क्षेत्राचा छंद जोपासला आहे. बारा ते चौदा वर्ष वयोगटाखालील त राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तिने सहभाग नोंदवलेला आहे. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये देशाला पदक मिळवून देण्याच्या दृष्टीने तिची तयारी सुरु आहे. वैजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांची वृदिका कन्या आहे. टेनिस स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचे आ.रमेश बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत आदींनी अभिनंदन केले आहे.