अर्धसैनिक दलाच्या कुटुंबातील व्यक्तींचा ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाल्याबद्दल माजी सैनिक संघटनेतर्फे सत्कार

वैजापूर,२२ डिसेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बीएसएफचे सेवानिवृत्त जवान बाळू मोरे यांचे वडील  रामचन्द्र विनायक मोरे, यांची अव्वलगावचे सरपंच म्हणून तसेच सीआयएसफचे कार्यरत नवनाथ पवार यांच्या पत्नी दिपाली नवनाथ पवार, सदस्यपदी  निवडून आल्याबद्दल त्यांचा माजी सैनिक संघटनेतर्फे गुरुवारी (ता.22) येथे सत्कार करण्यात आला.

ऑल इंडिया सेंट्रल एक्स पैरामिलीट्री फोर्सेस वेल्फेअर असोसिएशन वैजापूर यांच्या संकल्पनेतून सर्व आजी माजी सैनिक/अर्ध सैनिक येऊन त्यांचा सामूहिक सत्कार संत सावता महाराज मंदिर, माळी गल्ली वैजापूर येथे करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना  असोसिएशनचे सेक्रेटरी गौतम गायकवाड यांनी सांगितले की, आजी माजी सैनिकांच्या परिवारातील सदस्य कुठल्याही क्षेत्रात चांगली कामगिरी करत असेल तर त्यांचा सत्कार करणे हे कर्तव्य असून आमच्या संघटनेच्या माध्यमातून ते करीत राहू.

 यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी सोपान देवकर, जिल्हाध्यक्ष बाळू मोरे, माजी सैनिक संघटनेचे संदिप जगधने, सुमनबाई गायकवाड, नम्रता गायकवाड, लहू मोरे, सुनील गायकवाड, राहुल शिंगारे, भीमराज म्हस्के, राजेंद्र सिंगारे, विलास सवयी, किसन मोरे, बाबासाहेब मोरे, रवींद्र बर्डे, किसन मोरे, बाबसाहेब मोरे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.