वैजापूर शहरात रमजान ईद उत्साहात साजरी ; विश्वशांती व संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी प्रार्थना

वैजापूर, ३ मे  /प्रतिनिधी :- जगात विश्वशांती नांदावी, संपूर्ण मानव जातीचे कल्याण व्हावे व बंधू भाव वृद्धिंगत व्हावा अशी अल्लाह(ईश्वर) जवळ प्रार्थना करीत वैजापूरच्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईद-ऊल-फित्रची नमाज अदा करून रमजान ईद आज उत्साहात साजरी केली. 

हाफिज अरबाज यांनी नमाज महत्व व पद्धती विशद करून नमाज सादर केली तर सदर काझी हाफीजोद्दीन यांनी आभार मानले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष काझी मलिक व माजी नगरसेवक काझी लईक इनामदार यांनी सहभाग नोंदविला.

याप्रसंगी इदगाह मैदानावर उपस्थित आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावंकर, मा.नगराध्यक्ष साबेर खान,भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती, शिवसेना तालुका प्रमुख सचिन वाणी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ,पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, गोपनीय शाखेचे संजय घुगे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, सय्यद रियासतअली, वसंत क्लबचे सचीव जफर खान, भाजपचे डॉ. राजीव डोंगरे, नगरसेवक दशरथ बनकर, शैलेश चव्हाण, डॉ.निलेश भाटिया, स्वप्निल जेजुरकर, ज्ञानेश्वर टेके, पारस घाटे,भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, अमोल बोरणारे, प्रमोद कुलकर्णी, प्रशांत शिंदे, मजीद कुरेशी, हाजी अकिल सेठ, अल्ताफ बाबा, रियाज कुरेशी, काझी अलीमोद्दीन, सिकंदर सय्यद, रशीदखान, महंमद नूर आदींनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.