प्रमोद महाजन यांना अभिवादन

मुंबई,३ मे  /प्रतिनिधी :-भाजपा प्रदेश कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री व माजी भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस स्व. प्रमोद महाजन यांना १६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रदेश कार्यालय सह प्रभारी सुमंत घैसास, संतोष केळकर तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.