वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा येथे 15 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

वैजापूर,२० मार्च  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील मौजे लाख खंडाळा येथे आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या स्थानिक विकास निधीतून  मंजूर झालेल्या 15 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे उदघाटन आ.बोरणारे यांच्या हस्ते  रविवारी करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, हभप मधुसूदन महाराज, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप,जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, सीताराम पाटील वैद्य आदींची प्रमुख उपस्थिती होती 

सामाजिक न्याय विभाग अंतर्गत मंजुर झालेल्या दलित वस्ती परिसरात “10 लक्ष रुपये पेव्हर ब्लॉक” बसविणे कामांचे भूमिपूजन,ग्रामविकास विभागअंतर्गत मंजुर झालेल्या खंडोबा महाराज मंदीर परिसरात “5 लक्ष रुपये पेव्हर ब्लॉक” बसविलेल्या कामांचे लोकार्पण असे एकूण 15 लक्ष रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मोहन पाटील साळुंके, महेश पाटील  बुनगे, बाजार समितीचे माजी उपसभापती सुनिल कदम, विभागप्रमुख प्रकाश पाटील मतसागर, युवासेना जिल्हासमन्वय अमीर अली, तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, उमेश पाटील शिंदे, उपशहरप्रमुख कमलेश आंबेकर, मोहन पाटील आहेर, सुरेश राऊत, उपविभागप्रमुख अशोक पाटील हाडोळे, मल्हारी पठाड़े, वाल्मिक वाळके, राजेंद्र बावचे, प्रमोद गायकवाड, दादासाहेब ठोंबरे, प्रदिप गायकवाड, ईश्वर अंभोरे, शरद कोल्हे, साहेबराव पा शेळके, संभाजी पा शिंदे, वाल्मिक बावचे, गणेश शेळके, नवनाथ ठोंबरे, दिलीप देवकर, विठ्ठल वैद्य, दिलीप पवार, दत्तू वैद्य, सुनील तुपे, परसराम बाबा देवकर, किरण देवकर, गणेश मोरे, गोकुळ पवार, मंगेश शेळके, रशीद शेख, सागर तुपे, राहुल बावचे, आकाश बागुल, रामनाथ गुडघे, रामभाऊ कवार, संतोष मोरे, रावसाहेब आहेर, शिवाजी कदम, समाधान कवार, रावसाहेब शेळके, संजय वैद्य, बाबासाहेब वैद्य, मंगेश पवार, दत्तू जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बायगाव येथे मनरेगा योजनेअंतर्गत मंजूर कामाचे भूमीपूजन

Displaying IMG-20220320-WA0116.jpg

वैजापूर तालुक्यातील बायगाव येथे आ.रमेश पाटील बोरणारे  यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या वीस लक्ष रुपयाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू जाधव यांच्याहस्ते करण्यात आले.       

याप्रसंगी सरपंच नवनाथ राऊत , शिवसेनेचे विभागप्रमुख प्रभाकर जाधव , उपविभागप्रमुख संतोष दंवगे , शाखाप्रमुख तथा हभप भगवानराव जाधव , ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव जाधव, बाळासाहेब चेळेकर, नारायण पाटील जाधव, हभप बंडोपंत जाधव,अण्णासाहेब जाधव , पुंजाहरी जाधव , रावसाहेब सोनवणे,पोलिस पाटील मनसुब जाधव लक्ष्मण जाधव, गोकुळ जाधव, हरी जाधव, कडु पाटील जाधव, संजय अधाने, दादासाहेब जाधव , कडू करंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.