समृध्दी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले हडसपिंपळगावजवळ भरधाव कार संरक्षक कठड्याला धडकली ; जीवित हानी नाही

वैजापूर,१८ डिसेंबर / प्रतिनिधी :- समृध्दी महामार्गावर अतिवेगवान गतीने वाहने पळवण्याचा आनंद लुटण्याच्या नादात वाहनाचे अपघात घडण्याचे प्रकार सुरु झाले. वैजापूर परिसरात जाणाऱ्या या महामार्गावर सलग दोन दिवसात दोन वाहनाचे अपघात घडले. यापैकी एक वाहन आगीच्या तडाख्यात भस्मसात झाले. हडस पिंपळगाव शिवारातील पथकर आकारणी केंद्राजवळ  नागपूरकडून शिर्डीकडे जाणार्‍या कार चालकाचे वाहनावरील नियंञण सुटल्यामुळे वाहन संरक्षण कठडयावर आदळल्याचा प्रकार शनिवारी ता.17) सकाळी आठ वाजता घडला. सुदैवाने वाहनातील प्रवाशी यात जखमी झाले नाही मात्र यात वाहनाचे मोठे नुकसान झाले. 

नागपूर येथील रहिवासी हिमांशु कुभंलकर, अक्षय भुजाडे,चालक हितेश बल्लावी हे महिंद्रा एस.युव्ही क्र.( एम. ए. 40 बी. जे. 3281 ) वाहनातून शिर्डीचे दिशेने जाताना हडसपिंपळगाव शिवारात चालकांचे वाहनावर नियंत्रण सुटल्याने मुख्य रस्त्यापासून शंभर मीटर अंतरावरील पथकर नाक्या जवळील संरक्षक कठडयावर जोरात आदळली. वाहनातील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.अपघात घडल्यानंतर पथकर केंद्रातील मदतकार्य  करुन अपघात ग्रस्तांना वाहना बाहेर काढले.