औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीवर वैजापूर तालुक्यातील शिवसेनेचे बाबासाहेब पाटील जगताप व लताताई पगारे यांची नियुक्ती

वैजापूर ,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा लताताई पगारे या दोघांची औरंगाबाद जिल्हा नियोजन व विकास समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित व विशेष निमंत्रित म्हणून वीस जणांची निवड करण्यात आली आहे. या समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.नियोजन समितीवर काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार कल्याण काळे, सुभाष झांबड आणि नामदेव पवार यांना संधी देण्यात आली आहे. तर आमदारांमधून निवड करावयाच्या जागांवर आ.अंबादास दानवे व आ.उदयसिंह राजपूत यांची निवड करण्यात आली आहे.

Displaying IMG-20220201-WA0003.jpg
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप

जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या चार सदस्यांमधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप व अवचित वळवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लताताई पगारे(वैजापूर)

जिल्हा नियोजनाचा विशेष अनुभव असणाऱ्या 14 जणांचीही समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा लताताई पगारे(वैजापूर), दिनेश मुथा (लासूर ), आप्पासाहेब निर्मळ (पैठण), बाळासाहेब गायकवाड,राजू अहिरे, राजू वाघमोडे,सुदर्शन अग्रवाल, सुनीता औताडे, अशोक थोरात, बाळासाहेब भोसले व सय्यद अब्दुल कादीर यांचा समावेश आहे.

वैजापूर तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा लताताई पगारे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, जिल्हापरिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, मनाजी पाटील मिसाळ, संजय पाटील बोरणारे, रणजित चव्हाण, बाळासाहेब जाधव, वसंत क्लबचे सचीव जफर खान, नगरसेवक डॉ.निलेश भाटिया ,  भाऊसाहेब पाटील गलांडे, वसंत त्रिभुवन, सलीम वैजापुरी, युवासेनेचे आमेर अली, श्रीकांत साळुंके आदींनी  त्यांचे अभिनंदन केले आहे.