ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा फडकला

औरंगाबाद,२० डिसेंबर / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील २१९ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळी १०:०० वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली होती. मतमोजणीनंतर हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ७६ ठिकाणी विजयाचा झेंडा रोवत शिवसेनेचा  भगवा फडकला.औरंगाबाद जिल्ह्यातील सुजाण नागरिकांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  विश्वास ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात जास्त शिवसेनेचे उमेदवार निवडून आणले असल्याचे विरोधी पक्षनेते जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी कळविले आहे.

हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना ७६, राष्ट्रवादी २८ काँग्रेस १८, शिंदे गट २६ भाजपा ४१ महाविकासघडी १७, अन्य १३ जागांसह एकूण २१९ ग्रामपंचायतिचे संख्याबळ निश्चित झाले असून

पैठण तालुक्यातील आडूळ, बिडकीन या ग्रामपंचायती अत्यंत प्रतिष्ठेच्या व जिव्हाळ्याच्या ग्रामपंचायती मानल्या जातात. मात्र शिवसेनेच्याच्या मजबूत संघटना बांधणीमुळे या दोन्ही जागेवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. त्याचबरोबर पैठणसह, वैजापूर गंगापूर, रत्नापूर आदी ग्रामपंचायतीत देखील शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे.

ग्रामपंचायतीचा निकाल हाती लागताच सर्वत्र फटाके फोडून तसेच गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आमदार उदयसिंह राजपूत, सहसंपर्कप्रमुख आसाराम रोठे,जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे, अविनाश पाटील, कृष्णा डोणगावकर, अविनाश गलांडे, संजय निकम, अवचित वळवळे, बप्पा दळवी, सुदर्शन अग्रवाल, अंकुश रंधे, अशोक शिंदे तालुकाप्रमुख सचिन वाणी, दिनेश मुथा, सुभाष कानडे, राजू वरकड, संजय मोटे, मनोज पेरे, सोमीनाथ कापरे,अनंत भालेकर, शंकर ठोंबरे बाळासाहेब गायकवाड यांच्यासह सर्व स्थानिक शिवसेना, युवासेना, महिलाआघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.