औरंगाबाद जिल्ह्यात १० कोरोना बाधितांचा मृत्यू,3126 कोरोनामुक्त

औरंगाबाद, दि. 03 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 3126 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 157 जणांना सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 87, ग्रामीण भागातील 70 जणांचा समावेश आहे. आज एकूण 221 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 156, ग्रामीण भागातील 65 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 142 पुरूष, 79 महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 6264 कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 287 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 2851 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
सायंकाळनंतर आढळलेल्या 21 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्णसंख्या आहे.) आहे.यामध्ये 17 पुरूष आणि 4 महिला रुग्णांचा समावेश आहे.

Image may contain: text that says "कोरोना अपडेट्स जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद 3 जुले 2020 रात्री 9 वाजता आज बाधित (Postive) एकूण 6264 221 बरे झालेले रुग्ण आज 157 मृत्यू झालेले रुग्ण एकूण 3126 आज 07 उपचार सुरू असलेले एकूण 286 Follow us: AurangabadDIO 2852 InfoAurangabad distinfoffice@gmail.com"


औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (14)
गजानन नगर (1), गजानन कॉलनी (1), खोकडपुरा (1), विठ्ठल नगर, मुकुंदवाडी (1), हनुमान नगर (1), एन- दोन प्रकाश नगर (1), जाधववाडी (1), मुकुंद चौक (1), न्यू पोलिस कॉलनी, कोतवालपुरा (1), शरीफ कॉलनी, गल्ली नं. पाच (1), गौतम नगर (1), शिवाजी नगर (1), गारखेडा (1), जय भवानी नगर (1).
ग्रामीण भागातील रुग्ण (7)
सिडको महानगर (1), सिंहगड कॉलनी, बजाज नगर (1), अल्फोन्सा शाळेजवळ, बजाज नगर (1), गुलजार मोहल्ला, खुल्ताबाद (1), आखातवाडा, पैठण (1), मुंडवाडी, कन्नड (1), वरुडकाजी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

घाटीत पाच, मिनी घाटीत एक, खासगीत दोन, कोरोना बाधितांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) 03 जुलै रोजी अरुणोदय कॉलनीतील 72 वर्षीय पुरुष, दोन जुलै रोजी लोटाकारंजा येथील 48 वर्षीय स्त्री, शेलूद चाठा येथील 65 वर्षीय पुरुष, अझिम कॉलनी, जुना बाजार 1 औरंगाबाद यैथील 65 वर्षीय स्त्री, आणि सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 222 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी 217 रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते.
तर जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) बजाज नगरातील 56 वर्षीय पुरूष रुग्णाचा, शहरातील एका खासगी रुग्णालयात 2 जुलै रोजी पैठण येथील 73 वर्षीय महिला, 03 जुलै रोजी सिडकोतील 71 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत जिल्ह्यातील 217, विविध खासगी रुग्णालयातील 68, जिल्हा सामान्य रुग्णालयातील 02 अशा एकूण 287 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *