वैजापूरचे बाल साहित्यिक धोंडिरामसिंह राजपूत लोककला स्वछता कर्मी पुरस्काराने सन्मानित

वैजापूर, २ डिसेंबर  / प्रतिनिधी :-स्वच्छतादूत राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांचा स्वच्छतेचा वसा घेऊन वैजापूर शहरात साई माऊली सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या 25-30 वर्षांपासून स्वच्छता करणारे, स्वच्छतादूत तथा बालसाहित्यिक    धोंडीरामसिंह राजपूत यांनी औरंगाबाद येथील राज्यस्तरीय लोकलावंत मेळाव्यात मंगळवारी (ता.29) टी.व्ही.सेंटर जवळील संभाजी महाराज पुतळा ते ए.पी.जे अब्दुल कलाम संशोधन केंद्रापर्यंत प्रति गाडगेबाबा यांची वेषभूषा करून हातात खराटा घेऊन औरंगाबादवासीयांना ही स्वच्छतेचे पाठ गिरवले व” स्वच्छता नांदे ज्या घरी-आरोग्य तेथे वास करी”हा संदेश दिला. शिर्डी चे साई – बाबा यांचीही भूमिका हुबेहूब वठविली त्यांच्या या कलेची दखल घेत या राज्यस्तरीय लोककलावंत मेळाव्यात त्यांना”स्वच्छता कर्मी पुरस्कार ” जिल्हा शाखा लोककलावंत शाखेच्या वतीने अध्यक्ष एकनाथ त्रिभुवन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी राज्य लोककला शाखेचे अध्यक्ष विष्णू अण्णा शिंदे, शाहीर अशोक बागुल, समता परिषदचे आबासाहेब जेजुरकर, प्रमोद पठारे, आबा जाधव (शिवूर) यांची उपस्थिती होती.