वैजापूर शहरात डॉक्टरची डॉक्टरला जीवे मारण्याची मोबाईलवरून धमकी ; पोलिसांत तक्रार

वैजापूर,६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील नवजीवन कॉलनी भागातील रहिवासी असलेल्या एका जेष्ठ डॉक्टरला डॉक्टरनेच मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दोन दिवसांपूर्वी वैजापूर शहरात घडली असून या प्रकरणी डॉ. माधव जाधव यांनी पोलिस निरीक्षक वैजापूर यांच्याकडे तक्रार केली आहे.

काही दिवसांपासून वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात गैरव्यवहाराच्या विषयावरून डॉक्टरांमध्ये वाद निर्माण झाला आहे. या वादावरून शहरातील डॉ. योगेश राजपूत या डॉक्टरने माधव जाधव या जेष्ठ डॉक्टरला रात्रीच्या सुमारास दोन वेळा मोबाईलवर संपर्क करून जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी डॉ.माधव जाधव यांनी पोलिस निरीक्षक यांच्याकडे तक्रार करून डॉ. योगेश राजपूत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.