वैजापूर येथे होणाऱ्या श्री साई चरित्र पारायण सोहळ्याच्या अध्यक्षपदी विशाल संचेती

वैजापूर, २ डिसेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीसाई भक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे 2023 मध्ये होणाऱ्या श्री साई चरित्र पारायण सोहळ्याच्या पूर्व तयारीसाठी गुरुवारी (ता.01) संस्थेच्या पदाधिकारी व साई भक्तांची बैठक होऊन या बैठकीत 2023 ची उत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती यांची निवड करण्यात आली.

संस्थापक अध्यक्ष – कैलास साखरे

या बैठकीत निवडण्यात आलेली उर्वरित कार्यकारिणी अशी – 

संस्थापक अध्यक्ष – कैलास साखरे, कार्याध्यक्ष – उमेश राजपूत, उपाध्यक्ष – शैलेश पोंदे, प्रेम राजपूत, ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, कोषाध्यक्ष – मेहुल पोकर्णे, सचिव – हरीश लालसरे, सहसचिव – मनोज दोडे, सरचिटणीस – केशव आंबेकर,मार्गदर्शक राजेंद्र लालसरे 

कार्याध्यक्ष – उमेश राजपूत
उपाध्यक्ष – शैलेश पोंदे

या बैठकीस श्री साई भक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व शहरातील साईभक्त उपस्थित होते.