वैजापूर येथे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती फेरी

वैजापूर, १ डिसेंबर  / प्रतिनिधी :- संयम पाळा-एड्स टाळा, क्षणाची मजा-एड्स ची सजा, संयम और सुरक्षा-एड्स से रक्षा, मनाचा ब्रेक -उत्तम ब्रेक अशा घोषणा देत गुरुवारी (ता.01) वैजापूर शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली.

येथील सेंट मोनिका इंग्रजी शाळा, न्यू हायस्कुल, आनंद मेडिकल कॉलेज, जिल्हा परिषद कन्या प्रशाला विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत, शाहीर अशोक बागुल, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब वाघ यांनी व उपजिल्हा रुग्णालय व प्रेरणा सामाजिक संस्था यांनी शहराच्या विविध भागात फेरी काढून जनजागृती केली. जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षाचे घोष वाक्य ‘आपली एकता- आपली समानता’ एच.आय. व्ही.सह जगणाऱ्या करीता ही घोषणा देण्यात आली. सुरुवातीला प्रेरणा सामाजिक संस्थेने एड्स जनजागृती साठी लावलेल्या प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. 

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंकज पाटील ठोंबरे, जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत, वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन टारपे यांनी केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून फेरीला हिरवा ध्वज दाखविला. या प्रसंगी जिल्हासमन्वयक साधना गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा संस्थेचे साईनाथ बारगळ, बापुराव वाळके, संजय हिंदोळे, सुनीता जाधव, मनीषा व पूजा तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपमाला परदेशी, विजय पाटील, श्याम उचित, एल.पी.दुबे, सतिश नरवडे, राजेंद्र लाटे, पंकज कांबळे यांनी सहभाग नोंदविला. प्राचार्य किशोर साळुंके, मुख्याध्यापक ए.के.पगार, सूर्यवंशी, न्यू हायस्कुलचे कांतिराम शेजुळ, श्रीमती लता दलाल, श्रीमती भोये यांनी सहकार्य केले. कन्या प्रशाला मैदानावर जागतिक एड्स दिन प्रतिज्ञा डी.डी. ठाकूर यांनी दिली.