भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या दौऱ्यानिमित वैजापूर भाजपची शनिवारी बैठक

वैजापूर,३० डिसेंबर / प्रतिनिधी :-भारतीय जनता पक्षाचे राष्टीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या लोकसभा प्रवास योजनाअंतर्गत 2 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या व कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी वैजापूर भाजपची बैठक शनिवारी (ता.31) येथे आयोजित करण्यात आली आहे. 

डॉ. हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित या बैठकीस लोकसभा क्लस्टर प्रमुख तथा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे, संयोजक तथा जिल्हा उपाध्यक्ष संजय खांबायते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या बैठकीत वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी केले आहे.