वैजापूर शहरातील 27 वर्षीय तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

वैजापूर,८ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील टिळक रोडवर राहणाऱ्या प्रतीक चंद्रशेखरअप्पा साखरे (वय 27 वर्ष) या तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. प्रतीक हा औषध विक्रेते चंद्रशेखरअप्पा साखरे व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सुनीता साखरे यांचा मुलगा होता.

प्रतीक हा सकाळी प्रातःविधीसाठी गेल्यावर लवकर बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी त्याला आवाज दिला मात्र त्याने आतून प्रतिसाद दिला नाही त्यामुळे दरवाजा तोडून आत पाहिले असता तो खाली पडलेला आढळून आला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. प्रतीक याच्यावर रात्री लिंगायत समाज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रतीक हा मनमिळाऊ व शांत स्वभावाचा मुलगा होता त्याच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.प्रतीक याच्या निधनाबद्दल आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आ.भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी आदींनी शोक व्यक्त केला आहे.