वैजापूर तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

वैजापूर-जालना सह संपर्कपदी आसाराम पाटील रोठे

वैजापूर, १९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वैजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील शिवसेनेचे जेष्ठ नेते  आसाराम पाटील रोठे यांची वैजापूर व जालन्याचे सहसंपर्कपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अंकुश सुंभ यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे वैजापूर- गंगापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ यांची वैजापूर विधानसभा संघटकपदी तर मनोज गायके यांची वैजापूर तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, शहरप्रमुख प्रकाश पाटील चव्हाण, भाऊसाहेब पाटील गलांडे, रमेश पाटील सावंत, मोहनराव साळुंके आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.