वैजापूर येथे लक्ष्मी नेत्र रूग्णालयाचे आ.बोरणारे यांच्या हस्ते उदघाटन

वैजापूर, १९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- कोणताही रुग्ण डॉक्टरांना ईश्वर स्वरुप मानतो.  डॉक्टरांनी रुग्ण तपासणी अत्यंत सहानुभूतीने करावी. त्यांना आथिर्क झळ जास्त बसू नये याचाही विचार करून सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण सेवा द्यावी असे आवाहन वैजापूर-गंगापूर विधानसभेचे आमदार रमेश पाटील बोरनारे  यांनी केले. येथील लक्ष्मी नेत्रालयाचे उद्घाटन आमदार बोरनारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, माजी सभापती संजय निकम, ॲड. प्रमोद जगताप, खरेदी संघाचे चेअरमन साहेबराव औताडे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.सुजित नरेंद्र पाटील, डॉ.निकुंज गुजराथी, अजिनाथ मोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी नरेंद्र पाटील, प्रदीप गुजराथी, शुभम पाटील, अजय साळुंके, बंडू मोरे, डॉ.आशिष पाटणी, डॉ,संदीप म्हस्के यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले.