माजी नगराध्यक्ष साबेर खान यांना महामंडळावर घेऊन सच्च्या शिवसैनिकाला न्याय द्या – शिवसेना कार्यकर्त्यांच्या शिवतेज मेळाव्यात मागणी

Displaying FB_IMG_3687778707879278311.jpg

वैजापूर ,६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- कोणत्याही पदाची लालसा न ठेवता गेल्या 37 वर्षांपासून शिवसेना पक्षाचे निस्वार्थपणे काम करणारे व समाजातील सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे वैजापूर पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपाध्यक्ष साबेर खान यांना महामंडळावर घेऊन एक सच्या शिवसैनिकाला न्याय द्यावा अशी मागणी तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांसह युवासेनेने आज येथे आयोजित शिवतेज संपर्क अभियान मेळाव्यात केली.

जिल्ह्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित वैजापूर -गंगापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे, आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार असून त्यादृष्टीने कार्यकर्त्यानी कामाला लागावे असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी बोलताना केले तर शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी आपल्या भाषणात मराठवाड्यात शिवसेनेची ताकद अजून वाढायला पाहिजे त्यासाठी कार्यकर्ते जोडण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाकडे वाटचाल सुरू असून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय राज्यातील आघाडी सरकार घेत आहे.असे ते म्हणाले.

आ.अंबादास दानवे, आ.रमेश पाटील बोरणारे यांचीही या वेळी भाषणे झाली.कार्यकर्त्यानी गाफील न राहता येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत जास्तीत जास्त आ सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.माजी नगराध्यक्ष साबेर खान हे माजी आमदार स्व. आर.एम.वाणी साहेब यांचे कट्टर समर्थक व शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते असून गेल्या 30-35 वर्षांपासून ते निःस्वार्थ भावनेने व एकनिष्ठपणे शिवसेना पक्षाचे काम करीत आहेत.सर्वधर्मीयांमध्ये लोकप्रिय असलेल्या साबेरभाईंनी पक्षासाठी केलेल्या कार्य व त्यागाची दखल घेऊन त्यांची महामंडळावर नियुक्ती करण्यात यावी.अशी मागणी यावेळी आ.बोरणारे यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व युवासेनेने केली.

मेळाव्यास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणू पांडे, आनंद तांदुळवाळीकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, मनाजी पाटील मिसाळ, रामहरीबापू जाधव, खुशालसिंग राजपूत, नगरसेवक प्रकाश चव्हाण, शिवसेना महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सुनीता आऊलवार, सहसंपर्कप्रमुख सुनीतादेव, उपजिल्हासंघटक अंजली मांडवकर, सुलभा भोपळे, लता पगारे, वर्षा जाधव, संगीता बोरणारे, जे.के.जाधव, महेश बुणगे,अंकुश हिंगे,युवासेनेचे अमीर अली, श्रीराम गायकवाड, श्रीकांत साळुंके, कल्याण जगताप, मोहनराव साळुंके, भाऊसाहेब पाटील गलांडे, संजय बोरणारे, रणजित चव्हाण, लिमेश वाणी, डॉ.संतोष गंगवाल, बाळासाहेब जाधव, सलीम वैजापुरी,खलील मिस्तरी, बळीराम राजपूत, खंडू पाटील गाढे, प्रदीप साळुंके, कमलेश आंबेकर, वसंत त्रिभुवन यांच्यासह कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.