वैजापूर तालुक्यातील शहाजतपूर येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा नागरी सत्कार व विविध विकास कामांचे भूमीपूजन

वैजापूर, १३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शहाजतपूर येथे राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दादा दानवे यांचा भव्य नागरी सत्कार व विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवारी (ता.13) करण्यात आले.


याप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, किसानसेना जिल्हाप्रमुख संजय पाटील निकम, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, जिल्हा परिषदेचेमाजी सदस्य मनाजी पाटील मिसाळ, (शिवसेनेचे शहरप्रमुख प्रकाश पाटील चव्हाण, लासुर स्टेशनचे उपसरपंच संपत छाजेड, शिवसेनेचे जेष्ठ नेते भाऊसाहेब पाटील शिंदे, उपतालुकाप्रमुख रमेश पाटील सावंत, किशोर पाटील हुमे, अरुण पाटील शेलार, विभागप्रमुख प्रवीण सोनवणे, बाळासाहेब पाटील बडक,  माजी नगरसेवक लिमेश वाणी,  भाऊसाहेब बनसोडे (सरपंच जातेगाव), मनोज  गायके, अक्षय साठे, राजू पाटीलगलांडे, दादासाहेब पगार,भगवान शिंदे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

अनेक कार्यकर्त्यांनी व महिला भगिनींनी यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला.