औरंगाबाद येथे डिसेंबर महिन्यात राजपूत समाजाचा महामेळावा – नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी

वैजापूर, १३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-डिसेंबर महिन्यात औरंगाबाद येथे राजपूत/परदेशी समाजाचा महामेळावा होणार आहे या मेळाव्यात राजपूत समाजाच्या जात प्रमाणपत्र बाबत येणाऱ्या अडचणी व आणखी ईतर ही शैक्षणिक, सामाजिक बाबीबाबत शासनाला निवेदन देऊन या समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील राजपूत/परदेशी समाजाच्या नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वैजापूरच्या नगराध्यक्षांव तथा राजपूत /परदेशी समाजाच्या कार्यकर्त्या शिल्पाताई परदेशी यानी पालिकेच्या फुले-शाहू-आंबेडकर सभागृहात आयोजित बैठकीत केले. 

राजपूत /परदेशी समाजाचे जेष्ठ समाजसेवक व माजी शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विठ्ठलसिंह ढाकरे, राजुसिंह राजपूत, खुशालसिंह राजपूत, गोकुळसिंह राजपूत, सावनसिंग राजपूत, सतपालसिंह राजपूत, दिनेश ढाकरे, प्रेमसिंग गुलाबसींग राजपूत, सोनू राजपूत, सचिन राजपूत, डॉ,अनुराधा राजपूत, मंजुषा ढाकरे ,दिनेश राजपूत, श्री गोमलाडू यांनीही विधायक सूचना मांडून या मेळाव्याला तालुक्यातून जास्तीत जास्त नागरीक उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूचित केले. मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी प्रास्ताविक केले. डॉ, योगेश राजपूत यांनी आभार मानले. या बैठकीत राजपूत-परदेशी समाजाचे

वैजापूरचे अध्यक्ष जीवन राजपूत, जयसिंह राजपूत, संजय राजपूत, दिलीपसिंह राजपूत ,जी.जी.राजपूत, सूरज राजपूत यांच्यासह ग्रामीण भागातील गोलवाडी,जम्मनवाडी  येथील राजपूत/परदेशी समाजाचे नागरिक व युवा वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.