वैजापूर शहरातील मोबाईल शॉप फोडून 1 लाख 39 हजाराचे मोबाईल चोरी ; चोरट्यांना शोधण्यात पोलिसांना यश

वैजापूर, १० नोव्हेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर शहरात मध्यवर्ती भागातील साई श्रध्दा मोबाईल शाॅपी फोडून नामकिंत कंपनीचे 1 लाख 39 हजार रुपये किमंतीचे महागडे मोबाईल संच चोरणा-या आरोपीचा ठावठिकाणा लावण्यात ग्रामीण गुन्हे शाखा व स्थानिक पोलीसांना यश आले आहे. या गुन्ह्याचे तपासात पोलीस पथकांने दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून 11 मोबाईल संच जप्त करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान गुन्ह्यातील इतर फरार साथीदारांचा पोलिसांकडून शोध मोहीम युध्द पातळीवर सुरु केली आहे.

दिवाळीचे धामधुमीत 25 ऑक्टोबर रोजी पहाटे चोरट्यांनी साई श्रध्दा मोबाईल शाॅपी फोडली होती. वैजापूर पोलीस ठाण्यात दुकान मालक रविंद्र श्रीहरी जगताप यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला होता.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसांना आरोपी साबीर रईस कुरेशी 20 रा. सिल्लेखाना बडा तकीया मस्जिद जवळ औरंगाबाद त्यांच्या ताब्यातील मोबाईल विक्रीसाठी गि-हाईक शोधत असल्याची माहिती मिळाली होती.पोलीसांनी त्यांला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर त्यांनी त्यांच्या ओळखीचा सिराज सईद शेख रा. कासंबरी दर्गा परिसर याने मागील आठ दहा दिवसापूर्वी सिल्लेखाना कब्रस्तानाजवळ वैजापूर येथून चोरलेले 16 मोबाईल आणून दिले होते.या मोबाईल बदल्यात सिराजने साबीरला साडे पाच हजारांची रक्कम दिली.या 16 मोबाईल पैकी पाच मोबाईल ओळखीचे लोकांना खोटे सांगून विक्री केले व 12 संच त्यांच्याकडे असल्याची कबुली त्यांनी पोलीसांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील शेख नदीम,दिपक सुराशे, गणेश गांगवे, संजय तांदळे, योगेश तरमाळे जीवन घोलप यांनी 33 हजाराचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी साबीर रईस कुरेशी वय रा. औरंगाबाद, सरफराज अलीम कुरेशी वय 21 रा. किराडपूरा औरंगाबाद या दोघांना पूढील तपासासाठी वैजापूर पोलीसांचे स्वाधीन केले.