वैजापूर जिल्हा व सत्र न्यायालय वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड.संदीप डोंगरे तर उपाध्यक्षपदी अँड.ज्योती शिंदे निवड

वैजापूर ,१५ मार्च / प्रतिनिधी :-येथील जिल्हा व सत्र न्यायालय वैजापूरच्या वकील संघाची बुधवारी (ता.15) निवडणूक पार पडली.  वकील संघाच्या चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदी अँड. संदीप डोंगरे तर उपाध्यक्षपदी अँड.ज्योती शिंदे कापसे हे विजयी झाले.अँड.मझहर बेग व अँड. खैरनार यांचा त्यांनी पराभव केला. सचिवपदी अँड.प्रदीप चंदने व कोषाध्यक्षपदी अँड. राहूल धनाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी अँड.मझहर बेग व अँड.संदीप डोंगरे यांच्यात चुरशीची लढत झाली. अँड.डोंगरे यांना 62 तर अँड.मझहर बेग यांना 50 मते मिळाली.12 मताने अँड.डोंगरे हे विजयी झाले. उपाध्यक्ष पदासाठी अँड. ज्योती शिंदे कापसे व अँड.खैरनार यांच्यात लढत होऊन अँड.ज्योती शिंदे कापसे या विजयी झाल्या. त्यांना 63 तर अँड.खैरनार यांना 47 मते मिळाली.

निवडणूक अधिकारी म्हणून अँड. राजेंद्र हरिदास, अँड.प्रवीण साखरे व अँड.सईदअली यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अँड. नानासाहेब जगताप,अँड. देवदत्त पवार, अँड. संजय बत्तीसे, अँड. जयंत हरिदास, अँड. पी.आर. निंबाळकर, अँड. नितीन बावचे, अँड. सुनील धोत्रे, अँड. वैभव ढगे, अँड. राफे हसन, अँड. दत्तात्रय जाधव, अँड. यासर सय्यद, अँड. सय्यद नुजहत, अँड.सचिन दहीभाते, अँड.किरण त्रिभुवन आदींनी अभिनंदन केले.