सर्वस्व नष्ट करून कामेच्छा पूर्ण करतो:स्वर्वेद तृतीय मण्डल नवम अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

काम अगिन के उदय में, अन्तर घट ॲंधियार ।
बुद्धि विद्या सारी गयी, तन मणि जिवन संहार ।।०२।।

(स्वर्वेद तृतीय मण्डल नवम अध्याय) ०३/०९/०२

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :
काम-अग्नी म्हणजेच विषय-भोगाची प्रबळ इच्छा उत्पन्न झाल्यावर अंतर-शरीरात अंधःकार होतो. चांगलं-वाईटाचं भान कामी पुरूषास राहात नाही. अविवेकाच्या सागरात बुडून तो महा-अनर्थ करून बसतो. त्याची विषय-इच्छा इतकी प्रबळ होऊन जाते की त्या आवरणामुळे बुद्धी आणि विद्या सर्व नष्ट होते ज्यामुळे तो स्वतः अनियंत्रित होउन उचित-अनुचिताचं भान न ठेवता सर्वस्व नष्ट करून कामेच्छा पूर्ण करतो.

संदर्भ : स्वर्वेद
हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.
www.vihangamyoga.org