वैजापूरकरांची दिवाळी होणार गोड ; 57 हजार शिधापत्रिकाधारकांना मिळणार शिधा संच

वैजापूर,२२ऑक्टोबर /प्रतिनिधी :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत आनंदाचा शिधा या राज्य शासनाच्या  दिवाळी उपक्रमा निमित्त. वैजापूर तालुक्यातील तब्बल ५७ हजार २९६ शिधापत्रिकाधारकांना  चणा डाळ रवा साखर व पामतेल हे चार जिन्नस असलेला शिधा संच. केवळ शंभर रुपयात मिळणार आहे.

वैजापूर पर्यंत दिवाळी गोड होणार आहे. वैजापूर तालुक्यातील दोनशेहून अधिक. धान्य दुकान मार्फत शिधा संचाचेइ गुरुवारपासुन वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार मनोहर वाणी यांनी दिली. शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून अन्नधान्य अनुज्ञेय आहे अशा पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त या पॅकेजचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानुसार वैजापूर तालुक्यातील  अंत्योदय गटातील चार हजार ३८२,  प्राधान्य कुटुंब गटातील ४६ हजार ६४८ व एपीएल गटातील सहा हजार २६६ अशा सुमारे ५७ हजार २९६ शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याअंतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारकास केवळ शंभर रुपयांत एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चनाडाळ व एक किलो पाम तेल या चार खाद्यवस्तु मिळणार आहेत. तहसिलदार राहुल शिंदे, नायब तहसिलदार मनोहर वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाचे कैलास बहुरे, जहीर बेग, राजु चंदेल, विनोद आहेर व दिलीप राजपूत हे कर्मचारी वितरणाचे काम बघत आहेत.