वैजापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचा संवाद दौरा

वैजापूर, २२ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-आगामी ग्रामपंचायत निवडणूक 22-23 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तालुका शाखा वैजापूरच्या वतीने मंगळवारी तालुक्यात संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात तालुक्यातील पानवी, माळीघोगरगाव, अव्वलगाव, हमरापूर, वांजरगाव, सावखेडगंगा येथील ग्रामस्थ, कार्यकर्ते व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात त्यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थांशी चर्चा केली.

पक्षाचे सहसंपर्कप्रमुख ॲड.आसाराम पाटील रोठे, जिल्हा परिषद सभापती तथा उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, उपजिल्हाप्रमुख संजय पाटील निकम, तालुकाप्रमुख तथा नगरसेवक सचिन (बंडू) पाटील वाणी, उपतालुकाप्रमुख ॲड. रमेश पाटील सावंत,व उपतालुकप्रमुख डॉ. प्रकाश शेळके उपतालुकाप्रमुख सिताराम पाटील भराडे, विभागप्रमुख भीमाशंकर तांबे आदी या दौऱ्यात सहभागी झाले होते.