महिलांनी न्यायासाठी कायद्याचा आधार घ्यावा:जिल्हा-सत्र न्यायाधीश एम.मोहियोद्दीन

वैजापूर ,२९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- जेष्ठ महिला नागरिकांनी न्यायासाठी कायद्याचा आधार घ्यावा असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.मोहियोद्दीन शेख यांनी बुधवारी वैजापूर येथे जेष्ठ महिलांसाठी आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात केले.

नगरपालिकेच्या हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारकात वैजापूर तालुका विधिसेवा समिती,जॉयन्ट्स ग्रुप ऑफ सहेली, यंग सहेली व उत्कर्ष जेष्ठ महिला नागरीक सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी न्या.पी.टी. शेजवळ (काळे)  होत्या.जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.मोहियोद्दीन शेख, न्या.आहेर व तहसीलदार राहुल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Displaying IMG_20211028_192610.jpg

भारत माता पूजनाने शिबिरास सुरुवात झाली.प्रास्ताविक जॉयन्ट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या अंजलीताई जोशी यांनी केले. न्या.आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. जीवन हे आनंदाने जगण्यासाठी असते त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी आनंदी व समृद्ध जीवन जगावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

अध्यक्षीय भाषणात न्या.शेजवळ यांनी महिलांच्या वृद्धापकाळातील समस्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संतोषी भालेराव यांनी केले तर अलका साखरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.अबोली राका हिच्या पसायदानाने शिबिराची सांगता झाली. शिबिरास वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र हरिदास,साची सईद अली, जेष्ठ नागरिक संघाचे काशीनाथ गायकवाड,धोंडिरामसिंह राजपूत,सोपानराव निकम,कारभारी गायकवाड,रवींद्र साखरे,अशोक धसे,बबनराव क्षीरसागर,वैजीनाथ मिटकरी,महेश कदम,मंदाताई तांबे,महिला जेष्ठ नागरिक संघाच्या अर्चना राका,अनघा आंबेकर,वैशाली साखरे,सुनीता साखरे,योगिता साखरे,तारामती धसे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.