वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात सामाजिक संरक्षण शिबीर

वैजापूर,२२ऑक्टोबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई एक खिडकी योजनेअंतर्गत व जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्षाच्या सौजन्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात एचआयव्ही एड्स या दुर्धर आजारासह जगणाऱ्या पुरुष व महिलांसाठी गुरुवारी शासकीय योजना व सवलतीची माहिती देण्यासाठी  सामाजिक संरक्षण शिबीर घेण्यात आले.

विधी न्यायधिकरण यांच्या वतीने ॲड एन.आर.गायकवाड ,यानी कायदे विषयक माहिती दिली. एसटीच्या  वतीने बी.के.गरुड तर शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण विस्तार अधिकारी बी.के.म्हस्के यांनी सोयी सवलती  उपस्थित दुर्धर आजार ग्रस्तांना दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप जिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन टारपे हे होते. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात या आजाराचे दोन समुपदेशन केंद्र असल्याचे सांगून दुर्धर आजार ग्रस्तांना सर्वतोपरी मार्गदर्शन, समुपदेशन व औषधोपचार  देत असल्याचे विशद केले.

प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे यांनी केले,सूत्र संचलन जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले तर आभार समुपदेशक विजय पाटील यांनी केले.या समयी जिल्हा पर्यवेक्षक संजय पवार, अंकुश राठोड,वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपमाला मरमट, ॲड. प्रवीण साखरे, ॲड एस. पी.पवार, ॲड. आर.डी. सिरसाट यांची उपस्थिती होती.
समुपदेशक पंकज कांबळे, सतीश नरवडे, प्रशांत गिरी, मनीषा चौधरी, भारती पवार, विनोद गवई, आयसीटी चे प्रमुख विजय पाटील, शशिकांत पाटील,संजय शिराळे यांनी सहभाग नोंदविला. या प्रसंगी रुक्मिणी गवई, नूतन गिरी सिस्टर,लक्ष्मीकांत दुबे,विद्या इंगळे,किशोर वाघुले,राजू लाठे शुभांगी पांडे, रोहिणी उफाडे,वैशाली पंडित,बापू वाळके,साईनाथ बारगळ, पूनम संधारे उपस्थित होते.