वैजापूर येथील देवगिरी हॉस्पिटलचा दशकपूर्ती समारंभ

डॉ. अग्रवाल दाम्पत्य  देवदुत असल्याची रुग्णांची भावना

वैजापूर,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-
सतत कार्यरत राहून रुग्णांची सेवा करणारे डॉ. अग्रवाल दाम्पत्य  हे खरोखरच देवदूत असल्याची भावना रुग्णांनी व्यक्त केली. येथील समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात. डॉ. गणेश अग्रवाल व त्यांच्या पत्नी डॉ. दिपाली यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात हजर झालेल्या नागरिकांनी करोना काळात डॉक्टर अग्रवाल दाम्पत्याने केलेल्या सेवेचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रुग्णांना चोवीस तास सेवा देऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवत मनोभावे सेवा करून रुग्णांना मानसिक  भावनिक व वैचारिक आधार देत असल्याचे मत नागरिक यांनी व्यक्त केले. याप्रसंगी वैजापूरच्या नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, निवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी डॉ. अग्रवाल यांच्या सेवेचा गौरव केला.

यावेळी डॉ. अग्रवाल यांनी उपचार केलेले रुग्ण ठणठणीत बरे होऊन आपल्या डॉक्टरां विषयीच्या भावना व्यक्त  करताना भारावून गेले होते. आगामी काळात देवगिरी हॉस्पिटल तर्फे मोफत रुग्णवाहिकेची सेवा देण्यात येणार असून हॉस्पिटलचा विस्तार करून जास्तीत जास्त गरीब रुग्णांची सेवा करण्याचा मानस असल्याचे डॉ. गणेश अग्रवाल यांनी सांगितले. या कार्यक्रमाला भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव, शिवसेनेचे संजय निकम, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब जगताप, अंकुश हिंगे, दशरथ बनकर. प्रकाश चव्हाण, प्रकाश गायके,  पारस घाटे, ज्ञानेश्वर टेके,  अहमद पठाण, शमीम सौदागर,  विजय देशमुख, अशोक धसे आदी उपस्थित होते.