औरंगाबादमध्ये बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढणे विद्यार्थ्याच्या जीवावर बेतले

औरंगाबाद,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. हरिओम पंडित वय वर्षे १४ अस मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

शहरातील औरंगपुरा भागातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर महापालिकेच्या बस थांबतात. दरम्यान साजापूर ते औरंगपुरा या बसच्या फेऱ्या संपल्या होत्या, त्यामुळे बस मैदानात जाण्यासाठी वळण घेत होती, त्याच दरम्यान पुढच्या दरवाजाने हरिओम हा चढला. त्याच्या पाठोपाठ आठ नऊ विद्यार्थी चढले. हरिओम बसमध्ये चढताच थेट मागच्या सीटवर जाऊन बसला, आणि डोके बाहेर काढले.त्याच वेळेस बस वळण घेत असताना बाहेर काढलेले डोके मैदानाच्या भीतीला आणि गेटच्या अँगल घासले. अन हरिओम डोक्याला गंभीर मार लागला. त्याला ताक्ताळ महिला रिक्षाचालक आणि होमगार्ड म्हणून काम करत असलेल्या अनिता पारपल्ली यांच्यासह बसचालक कपिल लोखंडे यांनी घाटीत दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हरिओमला मृत घोषित केले. तो सरस्वती भुवन शाळेत नववीत शिकत होता.