एम जी. एम रुग्णालयात तीनशेहून अधिक बालके कर्करोगमुक्त

जागतिक  बाल कर्करोग दिन विशेष

औरंगाबाद,१४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- जगभरात  १५  फेब्रुवारी हा दिवस  जागतिक बाल कर्करोग दिन  म्हणून पाळला जातो. बदलत्या जीवनशैलीतून कॅन्सरचा विळखा आता आबालवृद्धांमध्ये जडताना दिसत आहे. दरम्यान दुर्धर आजारांपैकी एक म्हणून कॅन्सरकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे या आजाराबाबत अनेकांच्या मनात भीती आहे. त्यामुळेच जागतिक बाल कर्करोग दिनाचे औचित्य साधत  या आजाराबाबत समाजात जनजागृती निर्माण  करणे गरजेचे आहे.यानिमित्त एम.जी.एम  रुग्णालयात बाल कर्करोग रुग्णाचा मेळावा आयोजित करण्यात आला.

एम.जी.एम रुग्णालयात  मागील ५ वर्षात तीनशेहुन अधिक अठरा वर्षवयापर्यंतच्या  

बालरुग्णावर कर्करोगाचा यशस्वीरित्या  उपचार करण्यात आलाआहे .कॅनकिडस या दिल्ली स्तिथ संस्थेमार्फत उपचारादरम्यान सर्व रुग्णांना प्रत्येक महिन्याला  जवळपास २० किलो राशन व पोषक अन्न पदार्थाचे वाटप केले जाणार आहे. 

——————————————————-

लहान मुलांच्या कर्करोगाची लक्षणे 
ताप येणे, वजन कमी होणे, रक्त कमी होणे,शरीरात गाठी येणे, लाल डाग येणे, पोट फुगणेइत्यादी. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा. बालरोगतज्ज्ञ या लक्षणांच्याआधारावर योग्य ते तपासणी करून आपणास मार्गदर्शन करतील.

——————————————————–


एम. जी. एम. रुग्णालयाने  नुकताच ३०० बालरुग्णांना  कर्करोगमुक्त करण्याचा टप्पा पार केला आहे त्यानिमित्ताने ते बोलत होते . डॉ इधाटे म्हणाले , “ एम .जी. एम. रुग्णालयाने  पाच वर्षांपूर्वी बाल रक्तविकार व कर्करोग विभाग सुरु केला. गेल्या पाच वर्षात ३०० रुग्णांनी कर्करोग मुक्तीचा टप्पा पार केला आहे मराठवाड्यातील प्रथम हिमॅटॉलॉजि कक्ष, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी , समाजसेवक , आहारतज्ञ्  यामळे एम. जी. एम हे बाल कर्करोग उपचारांचे प्रमुख केंद्र बनले आहे”.

“कर्करोगाच्या उपचारामधील बहुतांश रुग्ण हे मध्यमवर्गीय  किंवा  ग्रामीण भागातले होते , ज्यांना अनेकआर्थिक अडचणी होत्या , त्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था व दाते खंबीरपणे उभे राहिले. पूर्णवेळ समाजसेवक असल्याने याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन लाभले. या सर्व  गोष्टीमुळे  कुटुंबीयांमध्ये  एक नवीन आशा निर्माण झाली आणि मिळालेल्या यशामुळे   कर्करोग उपचाराबद्दल विश्वास वाढला असेही त्यांनी सांगितले .

एम. जी. एम. चे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा  म्हणाले ,” भविष्यात मराठवाड्यातील रुग्णांना सेवा मिळावी यासाठी वैद्यकीय सुविधा अजून अद्यावत करण्यात येतील जेणेकरून त्यांना मुंबई किंवा पुणे प्रवास करून जाण्याची गरज पडणार नाही . औरंगाबाद हे आता परवडणारे कर्करोग  उपचार केंद्र  म्हणून पुढे येत असुन  याठिकाणी  मराठवाडा ,विदर्भ , खानदेश मधून देखील रुग्ण उपचारासाठी येत आहेत”.

“कर्करोगरावर मात  करुन  बहुतांश बालके सामान्य  आयुष्य जगू शकतात  .साधारपणे  ७० ते ८० प्रतिशत बालके पूर्णपणे ठीक होतात त्यासाठी लवकर निदान  व उपचार होणे आवश्यक आहे . औरंगाबाद हे उभरते आणि आणि परवडणाऱ्या खर्चात बाल कर्करोग उपचाराचे प्रमुख केंद्र म्हणुन  उदयास येत आहे”  असा विश्वास एम.जी. एम रुग्णालयातील लहान मुलांचे रक्तविकार व कर्करोग  विभागप्रमुख डॉ. तुषार इधाटे यांनी व्यक्त केला .

लहान मुलांचे  रक्तविकार व कर्करोग तज्ञ्  डॉ. तुषार इधाटे व त्यांची टीम यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल  एम. जी. एम.चे  सचिव अंकुशराव कदम, व्हाइस  चेअरमन  डॉ.  पी. एम. जाधव,  अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा , उपअधिष्ठाता डॉ.प्रवीण सुर्यवंशी व बालरोग विभाग प्रमुख डॉ माधुरी एंगाडे यांनी अभिनंदन केले आहे.