राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वैजापूर येथे क्रिकेट स्पर्धा

वैजापूर ,१४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे येथे वैजापूर – गंगापूर क्रिकेट चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर आज सकाळी दहा वाजता या स्पर्धेचे उदघाटन  आ.रमेश पाटील बोरनारे यांच्या हस्ते झाले. 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.कैलास पाटील, माजी आ.भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेरखान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचीन वाणी, मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, शहराध्यक्ष प्रेमसिंग राजपूत, प्रशांत शिंदे, काँगेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ,भाजपाचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, माजी उपनगराध्यक्ष शेख अकील सेठ, विजय दायमा, नगरसेवक प्रकाश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, डॉ,निलेश भाटिया, पारस घाटे, बिलाल सौदागर, राजेंद्र मगर, साईनाथ मतसागर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पवार, शिवसेनेचे उपशहरप्रमुख सलीम वैजापुरी, मंजाहरी पाटील गाढे आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये माजी आ.भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यातर्फे,  द्वितीय पारितोषिक 1 लाख 50 हजार रुपये माजी आ.सुभाष झाम्बड यांच्यातर्फेतृतीय पारितोषिक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्यातर्फे तर 50 हजार रुपयांचे चौथे पारितोषिक माजी उपनगराध्यक्ष शेख अकिलसेठ यांच्यातर्फे ठेवण्यात आले आहे.

या क्रिकेट चषक स्पर्धेत एकूण 12 क्रिकेट संघांनी भाग घेतला असून रविवार रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे.  स्पर्धेची सुरुवात स्व.आर.एम.वाणी क्रिकेट संघ व गणेश सी.सी.संघ यांच्या सामन्याने झाली. हा सामना गणेश सी.सी.संघाने जिंकला. स्पर्धा आयोजक अजय पाटील चिकटगावकर , प्रशांत शिंदे, प्रेमसिंग राजपूत,समीक्षक सलीम वैजापूर,मंजाहरी गाढे, गणेश चव्हाण, साईनाथ मतसागर, निकम, शेळके आदी परिश्रम घेत आहेत.