साधनेने चेतन परब्रह्माची प्राप्ति:स्वर्वेद प्रथम मण्डल तृतीय अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

मना मनन जब तक रहे, तब तक भजन न जान । 

अमन अगम अनुभव चले, सत्य भजन परमान ।।५३।।

(स्वर्वेद प्रथम मण्डल तृतीय अध्याय) ०१/०३/५३

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

जोपर्यंत मनात संसार-विषयांचे मनन, चिंतन, इच्छा, वासना असते, तोपर्यंत भक्ती होत नाही. मनाच्या अभावात , जिथे मनाची गती पोहोचू शकत नाही त्या चेतन आत्म विकासाने परब्रह्माचा अनुभव होतो. हाच वास्तविक सत्य भक्तीचा आदर्श आहे अर्थात  यालाच खरी परमेश्वराची खरी उपासना म्हणतात. म्हणून मन असता भक्ती होत नाही. मनाचा निरोध करून त्याचा लय आणि त्याला शांत केल्यानंतरच चेतन आत्मा, चेतन साधनेने चेतन परब्रह्माची प्राप्ति करतो.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org