श्रेष्ठ पुरूष अनेक विघ्नं आल्यावरही आपला स्वभाव बदलत नाहीत

“ स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

वड़ा वड़ापन में रहे, छोट विघ्न कर भाव । 

विद्युत जार न सेन्धु को, बड़ कर यही स्वभाव ।।०८।।

(स्वर्वेद तृतीय मण्डल दशम अध्याय) ०३/१०/०८

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

श्रेष्ठ पुरूष आपल्या मर्यादा पालनात सदैव एकसमान असतात आणि छोटे लोक आपल्या स्वभावानुसार दुसऱ्यांना कष्ट देण्यासाठी कार्यात अनेक अडथळे आणतात, तरीही श्रेष्ठ पुरूष त्यांना क्षमा करून आपल्या धर्म-मर्यादेचं पालन करतात. जशी वीज समुद्राला जाळू शकत नाही त्याचप्रमाणे श्रेष्ठ पुरूष अनेक विघ्नं आल्यावरही आपला स्वभाव बदलत नाहीत. हीच श्रेष्ठ पुरूषांची ओळख आहे.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org